आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 नाशिक

Mahadev Babar - पुण्यात उद्धव ठाकरेंना धक्का; माजी आमदार महादेव बाबर राष्ट्रवादीत प्रवेश करणार

शिंदे राम   338   23-06-2025 23:46:30

पुणे-  पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कारण, हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

महादेव बाबर यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक निलेश मगर, योगेश सासणे, माजी उपमहापौर बंडू गायकवाड हे देखील आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी हा मोठा धक्क मानला जात आहे. कारण, उपनगरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद म्हणून माजी आमदार महादेव बाबर यांची ओळख होती.मात्र गत विधानसभा निवडणुकीत महादेव बाबर यांना पक्षाने उमेदवारी डावलल्याने ते नाराज होते. विशेष म्हणजे पक्षाच्या अनेक कार्यक्रमांना देखील त्यांनी अनुपस्थिती लावली होती.

मात्र त्यानंतर आता महादेव बाबर हे उद्या(मंगळवार) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं समोर आलं आहे. महादेव बाबर यांच्यासह माजी नगरसेवक योगेश ससाने आणि निलेश मगर हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. महादेव बाबर यांच्या रूपाने पुणे शहराच्या उपनगरामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची मोठी ताकद होती मात्र याच ताकतीला कुठेतरी सुरुंग लागला असल्याचं बोलत आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.