पाथर्डी प्रतिनिधी - : अहिल्यानगर जिल्ह्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष तथा पाथर्डी तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य कै. देविदास लिंबाजी खेडकर यांचे कर्करोगाच्या आजारामुळे दु:खद निधन झाले.
बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन पाथर्डी तालुक्यात मनसेला कार्यरत केले. गेल्या काही दिवसापूर्वी युवा सेनेचे प्रमुख अमित ठाकरे यांनी त्यांची हॉस्पिटलमध्ये भेट घेत तब्येतीची विचारपूस केली होती.