चिंचवड प्रतिनिधी -: आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत राहिलेले समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले. महाराष्ट्रात ठिकठिकाणांहून वारकऱ्यांच्या पालखी पंढरपूरकडे रवाना झालेल्या असतानाच त्यावरच आजमी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने मोठा वाद होण्याची शक्यता आहे.
पालख्यांमुळे रस्ता जाम होतो, रस्त्यावर हिंदूचे अनेक सण साजरे केले. त्यावेळी कोणताही मुस्लिम व्यक्ती हिंदू सणांविरोधात तक्रार करत नाही. तर मग मुस्लिम व्यक्ती दहा मिनिटासाठी रस्त्यावर नमाज पठण केल्यावर तक्रारी का केल्या जात आहेत.
पिंपरी-चिंचवड भाजपा आक्रमक
भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे चांगलेच आक्रमक पाहायला मिळाले; त्यांनी अबू आझमीवर सडसडून टीका केली, ते म्हणाले की अबू आजमीचा मेंदू लहान असून सडलेला आहे, पालखी ही वर्षातून एकदा येते मात्र दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे वक्तव्य असे समाज द्रोही लोक करतात, अबू आजमी यांनी असे बोलू नये. समाजात तेढ निर्माण करू नये. ईदला आमचा विरोध नाही, ती साजरी केली पाहिजे. पिंपरी चिंचवड शहरात अशा विद्रोही व्यक्तीला पाय ठेवणार नाही असा सडसडीत इशारा भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी दिला.