पिंपरी प्रतिनिधी -: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिनाचा मुद्दा मांडल्यानंतर जागतिक योग दिन साजरा करायचा अशी मान्यता संयुक्त राष्ट्र परिषदेने दिली आणि त्यानंतर २१ जून २०१५ पासून आंतरराष्ट्रीय योग दिन सुरुवात करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या सर्व संघटना तसेच सर्व योग विद्या प्रेमी एकत्र येऊन आज सकाळी पिंपळे सौदागर येथील शिवछत्रपती लिनियर अर्बन गार्डन, पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रुपचे श्री सत्यजित भैया यांनी सुरेल संगीताच्या तालावर योगासने करून घेतले तसेच योगाचे होणारे फायदे शरीराला कसे होतात योग करणे हे किती महत्त्वाचे आहे याबद्दलची माहिती नागरिकांना दिली.
यावेळी पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टीचे शत्रुघ्न ( बापू) काटे यांनी उपस्थित राहून योग साधना करत नागरिकांनी सुद्धा नियमित योगा करण्याचे आवाहन केले ते म्हणाले की; नित्यनियमित योगा करणे म्हणजे जीवनमान उंचावणे, आरोग्याची काळजी योगासने घेतात त्यामुळे योग करणे काळाची गरज आहे. आपले शरीर व मन निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येकाने योगाचा स्विकार करून नियमितीत योगासने करून योगाला आपल्या जिवनाचे अविभाज्य घटक बनवावे असे काटे म्हणाले.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष श्री शत्रुघ्न (बापु) काटे, श्री जयनाथ काटे,आर्ट ऑफ लिविंगचे श्री अमित मगर,सौ कुंदाताई भिसे,श्री वसंत काटे,श्री विजय भिसे,श्री अरुण चाबुकस्वार,सौ अनिताताई काटे,श्री संदिप काटे,श्री संजय भिसे,श्री संदेश काटे,श्री मनोज ब्राह्मणकर,श्री मनिष श्रीवास्तव तसेच संघ भास्कर शाखा तसेच ज्योतिबा शाखेचे स्वयंसेवक आणि परिसरातील जेष्ठ नागरिक ग्रुपचे पदाधिकारी व सभासद,तरुण वर्ग यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
यावेळी या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सागर बिरारी यांनी केले.