Pune- pcmc
पिंपरी-चिंचवड शहराच्या आजुबाजूला अनधिकृत बांधकामे झाली आहेत. नाईलाइजाने गुंठेवारीमध्ये छोटी, मोठी घरे बांधून काही लोकांनी निवारा निर्माण केला. आता ही अनधिकृत बांधकामे कायम करण्याची भूमिका घेण्याशिवाय पर्याय नाही.
अनधिकृत बांधकामे नियमित करावीत. नवीन अनधिकृत बांधकामे होऊ देऊ नयेत,' अशी भूमिका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या ताथडवेतील संकल्प मेळाव्यात पवार बोलत होते.
'मुंबईनंतर पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कारखानदारीचे जाळे विस्तारले. शहर वाढले असून, चित्र बदलले आहे. शहरातील राजकारण, समाजकारण यात लक्ष घालण्याची गरज आहे. अनेक वर्षे हा परिसर आमच्या विचारांचा होता. पिंपरी-चिंचवडचा चेहरा बदलण्यासाठी अनेकांनी खस्ता खालल्या आहेत. यामागे गांधी, नेहरू, काँग्रेसच्या विचाराने शहरात काम केले. ही विकासाची गाडी पुढे गतीने घेऊन जायचे आहे,' असेही ते म्हणाले.