आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 मुंबई शहर

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे हरित आर्थिक स्वायत्ततेकडे पाऊल - शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे

शिंदे राम   127   14-06-2025 08:08:31

निगडी प्रतिनिधी (Pcmctahalka.in) देशाच्या शाश्वत आणि पर्यावरणपूरक विकासाच्या दिशेने वाटचाल करत असताना, स्थानिक स्वराज्य संस्थांची आर्थिक स्वायत्तता ही काळाची गरज ठरत आहे. याचे भक्कम उदाहरण म्हणजे पिंपरी-चिंचवड महापालिकेने उचललेले ऐतिहासिक पाऊल - देशातील पहिल्या 'ग्रीन म्युनिसिपल बॉण्ड'च्या यशस्वी लिस्टिंगचा! 

पिंपरी-चिंचवड हे भारतातील एक वेगाने वाढणारे औद्योगिक शहर. येथे सध्या महत्त्वाकांक्षी इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प, मेट्रो, ट्रान्सपोर्ट हब, आणि क्लायमेट रेसिलियंट उपायांची गरज आहे. अशा वेळी केंद्र आणि राज्य सरकारांकडून मिळणाऱ्या निधीवर अवलंबून राहणे, ही मर्यादा ठरू शकते. त्यामुळेच अशा आर्थिक स्वायत्त उपक्रमांची गरज वाढत आहे. ग्रीन बॉण्डसारखे उपक्रम हे केवळ आर्थिक स्रोत नाहीत, तर शहराच्या दीर्घकालीन विकासदृष्टीचा भाग आहेत.

'ग्रीन म्युनिसिपल बॉण्ड' म्हणजे केवळ आर्थिक साधन नव्हे, तर शाश्वततेकडे नेणारे एक महत्त्वाचे पाऊल आहे असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी केले आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.