आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 धुळे

पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस; ओढ्यात वाहने गेली वाहून

नितीन देशपांडे   180   14-06-2025 06:46:54

पुणे- पिंपरी चिंचवड शहरात आज (दि.14) मुसळधार पावसाने हजेरी लावली. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. या पावसात चऱ्होली येथील ओढ्यात चार ते पाच वाहने वाहून गेली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

 
पिंपरी चिंचवड शहरात आज संध्याकाळपासून टप्याटप्याने तुफान पाऊस पडत आहे. परिणामी चऱ्होलीगाव येथील डी.वाय.पाटील कॉलेज रस्त्यावरील घोसाळेवाडीतील ओढा ओसंडून वाहू लागला. यात रस्त्यावरील चार ते पाच वाहनं वाहत आली. याबाबतची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमन दलाने क्रेनच्या सहाय्याने ही वाहनं बाहेर काढली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 
दरम्यान आज झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी झाडे पडली होती. मोरवाडी पिंपरी, गायकवाड नगर पुनावळे, मोहन नगर घाईवाले वखार, ई ब्लॉक भोसरी एमआयडीसी, ज्ञानेश्वरी मंगल कार्यालय काळेवाडी, घारगे हाऊसिंग सोसायटी रुपीनगर तळवडे, महावीर पार्क मोहन नगर या ठिकाणी झाड पडीच्या घटना घडल्या होत्या. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.