गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचं एक प्रवासी विमान कोसळल्याची धक्कादायक बातमी नुकतीच समोर आली आहे. अपघातस्थळावरून आकाशात धुराचे प्रचंड लोट दिसत आहेत. दरम्यान, या अपघातानंतर बचाव पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते आणि अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच मेघानीनगरजवळ कोसळले. विमानतळापासून मेघनीनगरचे अंतर सुमारे १५ किलोमीटर आहे. घटनेनंतर लगेचच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्यास सुरुवात केली आहे. या विमानात २४२ प्रवासी होते. सर्वांचा मृत्यू झाला असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अहमदाबाद विमानतळावरून विमानाने उड्डाण केल्यानंतर काही क्षणात हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...