आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 पिंपरी -चिंचवड

PCMC पिंपरी चिंचवडसाठी जुनी प्रभाग रचना ; तर पुण्यात एक नगरसेवक कमी; अशी असेल नवी प्रभाग रचना

शिंदे राम   24   11-06-2025 07:28:22

पुणे (Pune PCMC) 

महापालिका निवडणुकांबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या नगर विकास विभागाच्या आदेशानुसार पुणे महापालिकेसाठी प्रभाग चार सदस्यांचा असणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत २०१७ ची जुनी प्रभाग रचना कायम ठेवली आहे.

 

गेल्या काही वर्षांत अनेक नगरपालिकांच्या हद्दी वाढविण्यात आल्या आहेत आणि काहींमध्ये दोन सदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्यात आली होती, परंतु आता एकसमानता आणण्यासाठी चार सदस्यीय प्रभाग पद्धत स्वीकारण्यात आली आहे. राज्य सरकारने २०१७ प्रमाणे चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार नगरपालिका निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात ४२ प्रभाग आणि १६६ नगरसेवक असतील असे यापूर्वी चर्चा होती. पण पूर्णकांकातील आकडा पकडला जाणार नसल्याने नगरसेवकाची संख्या एकने कमी होणार आहे. पुणे शहरात ३० लाख लोकसंख्येसाठी १६१ नगरसेवक आहेत. त्यापुढील प्रत्येक लाखासाठी एक नगरसेवक असणार आहे. २०११नुसार पुणे शहराची लोकसंख्या ३४ लाख ८१ हजार ९०० एवढी आहे. त्यामुळे ३४ लाखासाठी १६५ नगरसेवक असतील. प्रभागांची संख्या ४२ राहणार आहे.

राज्य सरकारच्या आदेशानंतर आता महापालिकेतर्फे प्रारूप प्रभाग रचना तयार केली जाणार आहे. ही प्रभाग रचना निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी पाठवली जाणार आहे. या प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता दिल्यानंतर त्यावर हरकती व सूचनांवर मागवून सुनावणी होणार आहे.

 

सुनावणीनंतर अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठवली जाणार आहे. त्यास मान्यता मिळाल्यानंतर अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होईल. प्रभाग रचनेची सुरुवात उत्तर दिशेकडून सुरु होणार आहे, तर दक्षिण भागात सर्वात शेवटचा प्रभाग असेल.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.