आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अकोला

मोशीतील काही भागात महावितरणचा लपंडाव! रहिवाशांना नाहक त्रास; निखिल बोऱ्हाडे

नितीन देशपांडे   465   09-06-2025 18:26:27

लवकरच तोडगा काढून नागरिकांना समस्येतून बाहेर काढू अधिकाऱ्यांचे आश्वासन

भोसरी प्रतिनिधी :- पावसाला सुरुवात झाली आणि पिंपरी चिंचवड शहरातील मोशी भागातील   गायकवाड वस्ती, इंद्रायणी पार्क, जीवन विश्व रेसिडेन्सी, रिवर ब्रीझ, साहिल ओम पार्क, विजेचा लपंडाव सुरू झाला आहे.

या भागामध्ये सतत विद्युत पुरवठा नेहमी खंडित होतो, याचा नाहक त्रास परिसरातील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे, या भागात मोठ्या प्रमाणात छोट्या मोठ्या व्यवसायिकांना, छोट्या कंपन्या व आयटी इंजिनियर राहत असून त्यांना वर्क फ्रॉम होम असल्यामुळे त्यांच्या देखील मोठ्या अडचणी वाढलेल्या दिसून येतात, 

विद्युत पुरवठा रस्त्याच्या पलीकडे असून तेथील येणाऱ्या केबल वारंवार ब्लास्ट होतात ते जॉइंट मारण्यास ८ ते १० लागतात यामुळे संपूर्ण परिसरातील रहिवाशी नाहक त्रासाला सामोरे जात आहेत.

याच संदर्भात भारतीय जनता पार्टीचे आमदार महेशदादा लांडगे कट्टर समर्थक तथा युवा नेते निखिल बोऱ्हाडे यांनी आज महावितरणचे कार्यकारी अभियंता देवकर साहेब यांची भेट देऊन समस्येचा पाढा वाचला,

यावेळी निखिल बोऱ्हाडे म्हणाले की;  ही लाईन नाशिक हायवेच्या अलीकडे ८०० मीटरची केबल टाकून नवीन सेक्रेट लाईन टाकणे हि लाईन टाकल्यास येथील नागरिकांचा प्रश्न सुटेल, यासंदर्भात समक्ष भेट देऊन पत्र व्यवहार केला

याप्रकरणी आमदार महेशदादांनी अधिकाऱ्यांना फोनवर संपर्क करुन लवकरात लवकरत सदर काम मार्गी लावण्यास सांगितले आणि तसे आश्वासन अधिकाऱ्यांकडुन देखील देण्यात आले आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.