पिंपरी प्रतिनिधी :- ऑक्टोबरपर्यंत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त आहे,
मिळालेल्या माहितनुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबरपर्यंत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी राज्यभरात तयारीत आहे असे देखील राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते.
पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची ताकद मोठी आहे याच अनुषंगाने, शहराध्यक्षपदी नवीन चेहऱ्यांना संधी देत भाजपाने मोठी मजल मारली आहे,
लाईव्ह महाराष्ट्राच्या प्रतिनिधीने नवनिर्वाचित अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना मुलाखती दरम्यान विचारले असता ते म्हणाले की
भाजप महायुती निवडणुकांसाठी सज्ज आहे, राज्याच्या वरिष्ठ नेतेमंडळी कडून युती संदर्भात जे आदेश येतील ते खाली पाळले जातील पिंपरी चिंचवड शहरात गेल्या पाच वर्षाच्या काळात भारतीय जनता पार्टीने स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप, आमदार महेशदादा लांडगे, चिंचवडचे लोकप्रिय आमदार शंकरशेठ जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमाताई खापरे, माजी आमदार अश्विनीताई जगताप, माजी खासदार अमर साबळे यांच्या नेतृत्वाखाली व दूरदृष्टीकोनातून सक्षम विकास केला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही निवडणुकीसाठी कधीही सज्ज आहे, पुढील काळात नवीन चेहऱ्यांना अधिकची संधी देण्यासाठी निश्चित मोठा प्रयत्न करणार असल्याचे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष काटे म्हणाले