आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 बुलढाणा

खडकवासला परिसरातील प्रकार ; जमिनीच्या वादातून शेतकर्‍याचा खून

शिंदे राम   342   14-04-2025 10:26:34

पुणे (Pcmctahalka.in) जमिनीच्या वादातून शेतकर्‍यावर धारदार हत्याराने वार करून त्याचा खून करून मृतदेह शेतात उभ्या असलेल्या कारच्या डिक्कीत ठेवल्याचा धक्कादायक प्रकार खडकवासला परिसरातील सांगरुण गावात घडला.

याप्रकरणी आरोपींविरुद्ध उत्तमनगर पोलिसांकडून गुन्हा दाखल केला आहे.

नारायण ऊर्फ नाना पांडुरंग मानकर (वय 73, रा. रुपरेखा बंगला, लोकेश सोसायटी, बिबवेवाडी) असे खून झालेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. याप्रकरणी सतीश विठ्ठल खडके (वय 35, रा. सांगरुण, ता. हवेली) याच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत नारायण मानकर यांचा मुलगा नीरज (वय 43) यांनी उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपींनी नथू मानकर यांच्या शेतात पार्क केलेल्या कारमध्ये नारायण मानकर यांचा मृतदेह ठेवला. त्यानंतर खडके आणि त्याच्याबरोबर असलेले साथीदार पसार झाले. दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत वडील घरी न परतल्याने मानकर यांचा मुलगा नीरज याने विचारपूस केली. शनिवारी सकाळी सांगरुण गावातील नथू मानकर यांच्या जागेत लावलेल्या कारमध्ये नारायण यांचा मृतदेह सापडल्याची माहिती मानकर यांच्या नातेवाईकांना मिळाली. नारायण मानकर यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याचे उघडकीस आले.

त्यांच्या गळ्यातील दोन सोन्याचे गोफ, अंगठी असा 19 तोळ्यांचा ऐवज चोरून आरोपी खडके आणि साथीदार पसार झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या घटनेची माहिती उत्तमनगर पोलिसांना कळविण्यात आली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन खंदारे करत आहेत.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.