आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 वाशीम

PUNE MAHANAGARPALIKA पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा प्रताप; बांधकाम'मधून पुन्हा 'बांधकाम'मध्येच बदली;

शिंदे राम   321   01-04-2025 13:19:58

पुणे (Pune महानगरपालिका) पुणे महापालिकेच्या आर्थिकदृष्ट्या मलईदार विभाग म्हणून ओळखल्या जाणार्‍या बांधकाम विभागातून पदोन्नतीने बदली झालेल्या काही अभियंत्यांची पुन्हा बांधकाम विभागातच बदली करण्याचा अजब निर्णय प्रशासनाने घेतला आहे.नियम धाब्यावरून बसवून करण्यात आलेल्या या बदल्यांमध्ये मोठी आर्थिक देवाण-घेवाण झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.

महापालिकेच्या 72 अभियंत्यांची पदोन्नती आणि बदल्यांची प्रक्रिया नुकतीच पार पडली. आज मंगळवार (दि.1 एप्रिल) पासून हे अभियंते बदलीच्या ठिकाणी रुजू होणार आहेत. मात्र, पदोन्नतीने करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे आता समोर आले आहे. एका विभागातून (खाते) तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर संबंधित अभियंता कर्मचार्‍यांची अन्य विभागात बदली करण्याचा नियम आहे.

मात्र, हा नियम धाब्यावरून बसवून काही कर्मचार्‍यांची पुन्हा सद्य:स्थितीत असलेल्या विभागामध्येच पुन्हा बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत. हा विभाग म्हणजेच महापालिकेतील मलईदार विभाग म्हणून ओळख असलेला बांधकाम विभाग आहे. या विभागामधील चार अभियंत्यांची पुन्हा त्याच विभागात बदली करण्याचा अजब निर्णय घेण्यात आला आहे.

सय्यद हबीब अ. रेहमान अब्दुल, विजय कुमावत, इरफान शेख, अभय कुमार शिंदे या चार अभियंत्यांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे चार अभियंत्यांचीच 'बांधकाम'मधून 'बांधकाम'मध्ये बदली करण्यात आल्याने या बदल्यांमध्ये आर्थिक देवाण-घेवाण झाल्याची चर्चा रंगली आहे.

विशेष म्हणजे बदल्यांमधील हा गोलमाल लक्षात येऊ नये, यासाठी बदल्यांच्या आदेशावर सध्याचे खाते शहर अभियंता कार्यालय आणि बदलीचे ठिकाण 'बांधकाम' असा उल्लेख करण्यात आला आहे.ते अभियंते पुन्हा बांधकाम विभागातपदोन्नतीने बदली झालेल्या अभियंत्यांमध्ये काही अभियंत्यांचे बांधकाम विभागाचे प्रेम उघड झाले आहे. सद्य:स्थितीला ज्या विभागात हे अभियंते काम करत आहेत. त्या विभागात काम करण्यापूर्वी ते बांधकाम विभागातच होते.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.