पुणे- आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी दोन दिवसांपुर्वीच बिनविरोध निवड झाली. त्यानंतर आता विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची आमदारकी धोक्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या आमदारकीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. अण्णा बनसोडे यांना 2 एप्रिलला मुंबई उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
आमदार अण्णा बनसोडे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत-धर यांनी अण्णा बनसोडेंच्या आमदारकीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. बनसोडे यांनी विधानसभा निवडणुकीत निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याचा सुलक्षणा शीलवंत-धर यांनी याचिकेतून आरोप केला आहे. न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या एकलपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली आहे.