पुणे- (Pcmctahalka.in)
खेड तहसिलदार नियुक्तीचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता. पण आता या याचिकेवर उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत,,सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) प्रशांत बेडसे यांना खेड तहसीलदारपदी नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.सर्वोच्च न्यायालयानं पहिल्याच सुनावणीच्यावेळी या याचिकेमध्ये कोणतेही तथ्य नसल्यानं याचिका दाखल करून घेण्यास पात्र नाही, असे नमूद करत फेटाळले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत प्रशांत बेडसे यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट)नं काही दिवसांपूर्वीच महसूल विभागाला दणका देताना खेडच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची नियुक्ती रद्द करण्याचे आदेश दिले होते. मॅटने ज्योती देवरे यांच्या जागेवर तत्कालीन तहसीलदार प्रशांत बेडसे यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते.
पण पुढील सात दिवसात बेडसे यांना खेडच्या तहसीलदारपदी नियुक्त करण्याचे आदेश मॅटने दिले आहेत. प्रशांत बेडसे यांनी आपल्यावर झालेल्या कारवाईच्या विरोधात मॅट आणि हायकोर्टात दाद मागितली होती. हायकोर्टाच्या सूचनेनंतर मॅटने देवरे यांची बदली रद्द करुन बेडसे यांना नियुक्ती देण्याचे आदेश 25 फेब्रुवारी 2025 रोजी दिले होते.
प्रशांत बेडसे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासाठी मास्क घातलं नाही, हे कारण हास्यास्पद असल्याचं मुंबई हायकोर्टानं म्हटलं होतं. पण आता हायकोर्टानं बेडसे यांना दिलासा देत त्यांचं निलंबन रद्द केलं होतं. यानंतर आता मॅटनंतर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं प्रशांत बेडसे यांची खेडच्या तहसीलदारपदी पुन्हा नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.