Pcmc पिंपरी चिंचवड
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणाचे सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराडबाबात (Walmik Karad) अनेक खुलासे समोर येत आहेत.
वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि त्याच्या टोळीने गैरमार्गातून कमावलेला पैसा पुणेमुंबई सारख्या शहरांमध्ये गुंतवल्याचा समोर आले आहे. या वाल्मिक कराडशी संबंधित असलेल्या ज्योती मंगल जाधव हिच्या नावावरती पुण्यातील एफसी कॉलेजच्या समोर अनेक ठिकाणी मालमत्ता घेतल्याच्या समोर आलं होतं, त्यानंतर आता या वाल्मिक कराडने पिंपरी चिंचवडच्या पार्क स्ट्रीट सोसायटीत एक फ्लॅट खरेदी केल्याची माहिती उघड झाली आहे. पार्क स्ट्रीट सोसायटीत 601 नंबरचा फ्लॅट वाल्मिक कराडचा असल्याची माहिती आहे. या फ्लॅटच्या दारावरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कारवाई करत कर थकल्याने नोटीस लावली आहे, हा फ्लॅट वाल्मिक बाबुराव कराड व मंजली वाल्मिकराव कराड (Walmik Karad) या दोघांच्या नावावरती आहे. मंजली कराड वाल्मिक कराडची पत्नी आहे. या दोघांनी हा फ्लॅट खरेदी केल्याची माहिती आहे. आता या ठिकाणी कोणीही राहत नसल्याची माहिती आहे. मात्र वाल्मिक कराड याच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत, अशातच त्याची अनेक ठिकाणची मालमत्ता समोर येत आहे.