आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

जीभ छाटली, ओठ कापले, तोंडात पैसे कोंबले...माजी IPS अधिकाऱ्याच्या घरात मोलकरणीचं भयानक कांड;

शरद लाटे  378   24-05-2026 10:46:33

Pune 

विश्वासू नोकरावर ठेवलेला आंधळा विश्वास किती जीवघेणा ठरू शकतो, याचा एक अंगावर काटा आणणारा प्रकार हैदराबादमध्ये समोर आला आहे. हैदराबादचे माजी पोलीस महासंचालक (DGP) विजय रंजन यांच्या घरात घुसून त्यांच्या पत्नी तनुजा रंजन यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.

या घटनेत घरातून तब्बल साडेतीन कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि मोठी रोकड लंपास करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची मास्टरमाइंड रंजन कुटुंबात वर्षानुवर्षे विश्वासाने काम करणारी नेपाळी मोलकरीण कल्पना असल्याचे समोर आले असून, पोलिसांनी तिला पुण्यातून अटक केली आहे. ही घटना 8 मे 2026 रोजी मध्यरात्री घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी डीजीपी विजय रंजन हे कामाच्या निमित्ताने बेंगलोरला गेले होते. घरात त्यांच्या पत्नी तनुजा रंजन आणि दोन मुली होत्या. 8 मे च्या मध्यरात्री सुमारे 1 च्या सुमारास कुटुंबात रंजन कुंटुबाता विश्वास संपादन केलेल्या कल्पना नावाच्या मोलकरणीने घराचे मुख्य गेट उघडून नेपाळच्या 3 अज्ञात पुरुषांना आत घेतले. हे तिघेही सोबत हत्यारे आणि चोरीचे साहित्य घेऊन आले होते. तनुजा रंजन पहिल्या मजल्यावरील खोलीत गाढ झोपल्या असताना कल्पना या तिघांना घेऊन तिथे पोहोचली. आरोपींनी वस्तूंची चोरी करण्यास सुरुवात केली असता तनुजा यांना जाग आली. त्यांनी आरडाओरडा करू नये म्हणून आधी त्यांचे तोंड दाबून हात-पाय बांधण्यात आले.

मध्यरात्री नेमकं काय घडलं?


तनुजा यांनी स्वतःला सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र घरमालकीणीला जर आपण जिवंत सोडले तर कुटुंब आपल्याला शोधून काढणाराच याची जाणीव कल्पनाला होती. त्यामुळे घरमालकीणीला जिवंत न सोडण्याचा निर्णय खुद्द कल्पनानेच घेतला होता. तिने आरोपींना तशी खूण केली. चोरीच्या मालातील पैशांचे बंडल आणि आसपासचे कपडे तनुजा यांच्या तोंडात कोंबण्यात आले. त्यानंतर आरोपींनी क्रूरतेची सीमा ओलांडत धारदार हत्याराने तनुजा यांचे ओठ आणि जीभ कापून टाकली. एवढ्यावरच न थांबता पुन्हा तोंडात पैशांचे बंडल कोंबून गळा दाबून त्यांची हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे याच वेळी रंजन यांच्या दोन मुली वरच्या मजल्यावर झोपलेल्या होत्या, तर तळमजल्यावर कल्पनाची खोली होती.

सकाळी रंजन कुटुंबात मोठा आक्रोश


मध्यरात्री 2 ते अडीचच्या सुमारास सर्व आरोपी बॅगा भरून पसार झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता जेव्हा दुसरी मोलकरीण कामावर आली आणि तिने बेल वाजवली, तेव्हा तनुजा यांच्या दुसऱ्या मुलीने दरवाजा उघडला. कल्पना घरात कुठेच दिसत नसल्याने आणि तिचा फोन स्विच ऑफ असल्याने दोघींनी तनुजा यांच्या खोलीत जाऊन पाहिले. तिथे तनुजा रंजन रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या आढळल्या. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे आणि जीभ व ओठ कापल्याचे स्पष्ट झाले आहे.

दिल्लीच्या हायटेक 'मोलकरीण गँग'चा पर्दाफाश


विजय रंजन हे राज्याचे माजी मोठे पोलीस अधिकारी असल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे जलदगतीने फिरवली. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा माग काढण्यात आला. सुरुवातीला रंजन कुटुंबीयांचा कल्पनावर पूर्ण विश्वास होता, मात्र पोलिसांनी तिची पार्श्वभूमी तपासली तेव्हा तिची 'क्राईम कुंडली' समोर आली. कल्पना ही दिल्लीतून ऑपरेट होणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय नेपाळी गँगची सक्रिय सदस्य आहे. या दिल्लीतील गँगमध्ये नेपाळी मुलींना श्रीमंत घरांमध्ये हाऊस हेल्प म्हणून कसे शिरावे, लोकांचा विश्वास कसा संपादन करावा आणि मौल्यवान वस्तू कुठे ठेवल्या जातात याची माहिती कशी काढावी, याचे रीतसर ट्रेनिंग दिले जाते. या गँगने उत्तर प्रदेशातही अशाच पद्धतीने एकाची हत्या करून दरोडा टाकला होता. कल्पनाने रंजन यांच्या घरात नोकरीला लागताना दिलेले ओळखपत्र आणि कागदपत्रे पूर्णपणे बनावट (फेक) असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

मुख्य आरोपी कल्पनाला पुण्यातून उचललं


चोरी केल्यानंतर कल्पनाने तिचा फोन बंद केला आणि नामपल्ली स्टेशनवरून तेलंगणा एक्सप्रेस पकडली. ती नेपाळ किंवा मुंबईला पळण्याच्या तयारीत होती, मात्र पोलिसांनी सर्व सीमांवर अलर्ट जारी केला होता. अखेर तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी पुण्यात धाड टाकून कल्पनाला तिच्या मावशीच्या घरून ताब्यात घेतले.

चोरी प्रकरणात नवा ट्विस्ट


या प्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. पोलिसांनी कल्पनाला अटक केली असली तरी साडेतीन कोटींचे दागिने आणि रोकड घेऊन तिचे तीनही पुरुष साथीदार फरार झाले आहेत. अटक झाली तेव्हा कल्पनाकडे काहीही मुद्देमाल नव्हता. ज्या गँगचा आजवर एकही सदस्य पकडला गेला नव्हता, तिथं या गँगची मुख्य मोहरा असणारी कल्पना एकटीच पोलिसांच्या जाळ्यात कशी अडकली? साथीदारांनी तिला मुद्दाम अडकवून पैशांसह पळ काढला का? याचा तपास आता हैदराबाद आणि दिल्ली पोलीस करत आहेत. या घटनेमुळे व्हीआयपी वर्तुळात आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून, घरात नोकर ठेवण्यापूर्वी त्यांचे पोलिसांकडून सखोल व्हेरिफिकेशन करणे किती गरजेचे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.