शरद लाटे 293 16-06-2025 09:09:58
पुणे- मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष वर्धापनदिन संकल्प मेळावा कार्यक्रमाला शिवसेना (एकनाथ शिंदे गट) जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर यांनी आज (दि. 15) हजेरी लावली. जिल्हाप्रमुख पोखरकर यांनी मेळाव्याला उपस्थिती दाखविल्याने पुणे जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे.
या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई शहर अध्यक्षा राखीताई जाधव यांनी त्यांचे व्यासपीठावर स्वागत केले. मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष वर्धापन दिनानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, खासदार निलेश लंके, मुंबई शहर अध्यक्षा राखीताई जाधव, यांच्यासह 36 तालुके आणि सहा जिल्ह्यातील पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या या कार्यक्रमाला पुणे जिल्हा प्रमुख (एकनाथ शिंदे गट) भगवान पोखरकर यांनी उपस्थिती दाखवत या व्यासपीठावर शरद पवार यांच्याशी चर्चा केली.
शरद पवार भगवान पोखरकर यांची भेट पुणे जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. खासदार निलेश लंके यांनी ही भेट घडवून आणल्याचे बोलले जाते.